नागरिकांसाठी टीपा

स्थान शोधा

रेल्वेत आपल्या जागी स्थानापन्न होण्यापूर्वी सीट अथवा बर्थखाली कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बेवारस स्थितीतील सामान नाही, याची खात्री करा. एखादी संशयास्पद वस्तू तुमच्या नजरेस पडल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिस किंवा रेल्वेतील अधिकाऱ्यांना द्या.

विस्फोटकांपासून सावध रहा

खेळणी, सामान, बॅगा, सुटकेस, रेडिओ/ट्रांझिस्टर, टिफीन बॉक्स, मोबाईल फोन इत्यादींसारख्या बेवारस वस्तू नजरेस पडल्यास त्यांना कदापी स्पर्श करू नका.

अज्ञात व्यक्तीकडून सावध रहा

कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून बिस्कीटे, समोसा, ब्रेड, लाडू, नमकीन, चहा, कॉफी, दूध, शीतपेय, पाणी तसेच प्रसाद यांसारखे खाद्यपदार्थ स्वीकारू नका. त्यामध्ये तुम्हाला बेशुद्ध करण्यासारखी द्रव्ये असू शकतात. तुम्हाला असे पदार्थ देण्यापूर्वी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते वस्तू खाण्याचा तुम्हाला आग्रह करतात. तुम्हाला बेशुद्ध करून तुमचे सामान व पैसे लुटण्याची शक्यता आहे.

गुन्हेगारांपासून सावध रहा

पाकिटमार, भुरटे चोर, सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा. असे गुन्हेगार गर्दीच्या ठिकाणी वेळ साधून आपल्या ऐवजावर हात साफ करतात.

प्रवासा दरम्यान सावधगिरी

रेल्वे प्रवासादरम्यान केवळ अधिकृत विक्रेते व हमाल यांच्यावरच विश्वास ठेवा.

सामानाची सुरक्षितता

तुमच्या सामानाची काळजी घेण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तसेच तुमचे सामान आणि मूल्यवान वस्तू कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांभाळण्यासाठी देऊ नका.