ठळक बातम्याहरवलेले व्यक्ती

हे शोध इंजिन हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी समर्पित आहे.

अपघाती मृत्यू

हा शोध इंजिन दुर्घटना बळी, हरवलेली / सापडलेली व्यक्ती आणि अज्ञात मृतदेह शोधण्यास समर्पित आहे.

महिला मदत कक्ष

गाडीत प्रवास करताना हिंसा झाल्यास महिला व मुले किंवा त्यांच्या वतीने कोणीही व्यक्ती आम्हाला ९४२२३२७१३० येथे कॉल करु शकते.

गुन्हे माहिती

गुन्हे संबंधित माहिती तपशील आणि आकडेवारीसह पाहण्यास मदत करते.

नागरिकांसाठी टीपा

नागरिकांना त्यांच्या आसपास होणा-या आपत्कालीन घटनांविषयी सुरक्षितता सूचना / सतर्कतेचा इशारा देते.

नागरीक अॅलर्ट वॉल

नागरिकांना त्यांच्या आसपासच्या गोष्टींवर होणा-या आपत्कालीन घटनांविषयी सूचना / सतर्कतेचा इशारा देते.

रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, असा आमचा उद्देश आहे. रेल्वे सक्षम बनवण्यासाठी आणि जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी प्रवाशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या हालचालीवर प्रवाशांनीही बारीक लक्ष ठेवावे. त्यात काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पुणे लोहमार्ग पोलिसांना त्याची माहिती द्यावी. तुमची सतर्कता आणि सहकार्य खूप मोठा बदल घडवू शकतो.

भविष्यातील सर्व प्रवासांसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.

लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूवर पडेल जेव्हा नजर, लागलीच द्या पोलिसांना खबर ...!!

दीपक साकोरे (भापोसे)

पोलीस अधीक्षक

लोहमार्ग पुणे