संदेश
रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, असा आमचा उद्देश आहे. रेल्वे सक्षम बनवण्यासाठी आणि जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी प्रवाशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या हालचालीवर प्रवाशांनीही बारीक लक्ष ठेवावे. त्यात काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पुणे लोहमार्ग पोलिसांना त्याची माहिती द्यावी. तुमची सतर्कता आणि सहकार्य खूप मोठा बदल घडवू शकतो. भविष्यातील सर्व प्रवासांसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेवा, "संशयास्पद वस्तूवर पडेल जेव्हा नजर, लागलीच द्या पोलिसांना खबर ...!!"