गुन्हा कसा कळवावा
गुन्हा कसा कळवावा
अनु क्रमांक | माहिती |
---|---|
१ | तक्रारदार वैयक्तिकपणे कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार (एफआयआर) दाखल करू शकतात अथवा पोस्टद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. |
२ | तोंडी अथवा लेखी तक्रार करून तक्रार नोंदवता येते. |
३ | पत्र अथवा ई-मेलद्वारे संपूर्ण माहिती देऊनही तक्रार देता येऊ शकते. |
४ | धावत्या रेल्वेत गुन्हा घडलेला असल्यास तक्रारदार कोणत्याही पुढील रेल्वेस्थानकावरील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात. अथवा अथवा गुन्हा घडलेल्या वेळी धावत्या रेल्वेत कर्तव्यावर असलेल्या तिकीट निरीक्षकाकडे तक्रार दाखल करण्याचीही सोय आहे. |
५ | पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करून घेणे टाळल्यामुळे दुखावलेले तक्रारदार पोस्टाद्वारे थेट पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, पुणे यांच्याकडेही तक्रार करू शकतात. |